साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

झेलावयास माझी छाती तयार आता
घाला नव्या दमाने तुमचे प्रहार आता

शब्द माझा अर्जुनाचा बाण आहे
केशवाच्या बासरीचा प्राण आहे
झोकतो आहे जरी प्याले विषाचे
काव्य माझे अमृताची खाण आहे

ओठांस लाव राणी प्याला रिता कराया
ओतीन जीव माझा प्याला पुन्हा भराया

स्पंदनांचा आज माझ्या आसरा हो
तू सखे बागेत माझ्या मोगरा हो
शोधतो मी माझिया रूपास राणी
दर्पणी जो पाहतो तो चेहरा हो

बेभान नाचणारे बेहोष घुंगरू मी
बेताल पावसाची का आर्जवे करू मी?
माझ्याच बासरीचे रानात सूर सार्‍या
सांगा कुणाकुणाचे वनवास मंतरू मी?

आता असे जळूया
विश्वात दर्वळूया

पेटून आज दोघे
प्रेमात पाघळूया

बायको जेंव्हा बोलत असते
तेंव्हा ऐकून घ्यायचं असतं
नाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं!

डोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी
डोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी

प्राण थोडासा जळावा लागतो...
मीलनासाठी दुरावा लागतो!
ताल का नुसतेच सांभाळायचे?
सूरही राणी जुळावा लागतो...

ही काय भानगड आहे?

तुमच्या माझ्या आयुष्यातल्या साध्या सोप्या घटनांवरच्या साध्या सोप्या कवितांची ही एक ऑनलाईन मैफील... इथे जेंव्हा यावंसं वाटेल तेंव्हा या... जे वाचावंसं वाटेल ते वाचा... आणि घटकाभर मन रमवून आपल्या कामाला लागा!

इतरांना आवडलेलं

©2000-2018 Prasad Shirgaonkar, All rights reserved.