माझ्या विषयी थोडंसं...

Prasad Shirgaonkarखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही! तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो!

लेखन विषयक

 • शिक्षणाने कॉस्ट अकाउंटंट, व्यवसायाने तंत्रज्ञ आणि हृदयाने कवी!
 • जन्मगांव पुणे. नोकरीनिमित्त बारा देशांमधल्या पंचवीसेक महानगरांमध्ये प्रवास वास्तव्य.
 • काव्य, कथा आणि ललित लेखनामध्ये विशेष रूची. गेली अनेक वर्षे अनेक वर्तमानपत्रे, नियतकालिके ऑनलाईन फोरम्सवर नियमित लिखाण.
 • साधं सोपं डॉट कॉम ही स्वतःची कवितांची वेबसाईट २००६ मध्ये प्रकाशित. या वेबसाईटला आजवर पाच लाखाहून अधिक वाचकांची भेट.
 • i-बापहा आधुनिक काळातील वडील मुलगा यांच्या नात्यावरचा स्फुटलेख वजा कविता संग्रह (२०१५), ‘सुखांचे सॅशेहा ललित लेख संग्रह आणिभटक्याची डायरीहा जगभरातल्या अनेक देशांतील प्रवासांदरम्यान लिहिलेला लेख संग्रह प्रकाशित. (२०२०)
 • प्रासादिकह्या संपूर्णपणे एका माणसानं लिहिलेल्या मोबाईल दिवाळी अंकाचं २०१५ पासून सलग आठ वर्षे लेखन-संपादन.
 • फोटोशाळानावाच्या मराठी मधून फोटोग्राफीचं प्रशिक्षण देणाऱ्या वेब-चॅनलचा निर्माता.
 • सुजाण आणि सजग पालकत्व या विषयावरच्या YouTube वर गाजलेल्या चार लघुपटांचा (Shortfilms) लेखक-दिग्दर्शक.
 • 'आनंदाचं गांवहा स्वनिर्मित कविता, गझलांचा कार्यक्रम. ज्याचे 2002 पासून पुणे, मुंबई लंडनसह अनेक शहरांमध्ये अनेक प्रयोग संपन्न.

तंत्रज्ञान विषयक

 • एकूण ३० वर्षांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा कामाचा अनुभव, त्यामध्ये २६ वर्षे वेब आणि मोबाईल तंत्रज्ञानात तर १८ वर्षे ड्रुपल (Drupal) ह्या मुक्तस्रोत प्रणालीमध्ये काम.
 • आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक, वक्ता आणि ड्रुपल-तज्ज्ञ म्हणून कार्यरत. ड्रुपल प्रणालीचा ग्लोबल सर्टिफिकेशन प्रॉग्रॅम सांभाळण्याची जबाबदारी. ह्या आधी चार देशांतल्या १५ शहरांमध्ये ४०हून अधिक ड्रुपल प्रशिक्षणाच्या कार्यशाळा संपन्न.
 • DrupalCon ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये २०१४ (ॲमस्टरडॅम) २०१६ (मुंबई) येथे expert speaker म्हणून सहभाग, ह्याशिवाय अमेरिका युरोपमध्ये झालेल्या १२ ड्रुपलकॉन्समध्ये सहभाग
 • स्वतःचा मराठी वेबसाईट्स डॉट कॉम हा व्यवसाय करत असताना ६० हून अधिक मराठी वेबसाईट्सची निर्मिती
 • बृहदकोश (https://bruhadkosh.org/) ह्या ऑनलाईन मराठी शब्दकोशसंग्रहाचा आणि गणेशपूजा ॲप ह्या लोकप्रिय ॲन्ड्रॉईड ॲपचा निर्माता

बस... या पलिकडे जे सांगावंसं वाटतं ते सगळं माझ्या लिखाणात आहेच! हे सर्व वाचल्यावर माझ्याशी संपर्क साधायची इच्छा राहिलीच असेल तर येथून साधू शकाल - प्रसाद शिरगांवकर