आपला ग्लास आपण सांभाळावा
दुसर्याला घेऊ देऊ नये
दुसर्याचा ग्लास उचलण्याची
वेळ आपल्यावर येऊ नये
अशीही वेळ असते जेंव्हा
कोणीच आपला नसतो
म्हणून आपण प्यायला जातो
तर नेमका ड्राय डे असतो
आपला पेग आपण भरावा
दुसर्यावर विश्वास ठेवू नये
आपला ग्लास , आपली बाटली
दुसर्याच्या हातात देऊ नये
असं उगीच लोकांना वाटतं
की दुःख दारूत बुडून जातं
दुःख असतं हलकं हलकं
अल्कोहोलसोबत उडून जातं!
एकदा प्यायला बसल्यानंतर
तुझं-माझं करू नये
तुझी काय , माझी काय
नशा कधी सरू नये
तुला जायचंच असेल तर निघून जा ,
जाण्यासाठी भांडू नकोस
प्यायची नसेल तर पिऊ नको ,
पण दारू अशी सांडू नकोस
स्कॉच प्यावी कोरी , कच्ची
बर्फ नको , सोडा नको
उंच आभाळी उडण्यासाठी
पंख हवे... घोडा नको!
आपला आवाज दणकयात हवा
उगाच लाऊडस्पीकर कशाला ?
पिऊन प्यायची तर देशी प्यायची
उगाच फॉरीन लिकर कशाला ?
फॉरीन लिकर कितीही प्यावी
काही केल्या चढत नाही
देशी आपली थोडीशीच प्यावी
दोन दोन दिवस उतरत नाही