कवितासंग्रह

शिल्पकार - गझल संग्रह १

शिल्पकार हा माझा पहिला ऑनलाईन गझल संग्रह. या संग्रहात 2002 ते 2004 च्या दरम्यान लिहिलेल्या आणि प्रामुख्याने मायबोली.कॉम वर प्रकाशित झालेल्या गझला संकलित केल्या आहेत.

हृदयात या रुजले ऋतू - गझल संग्रह २

हृदयात या स्र्जले ऋतू हा माझा दुसरा ऑनलाईन गझल संग्रह. यात 2003 - 04 मधे लिहिलेल्या आणि प्रामुख्याने मायबोली.कॉम वर प्रकाशित झालेल्या गझला संकलित केल्या आहेत.

शब्द माझे मैफलीसाठी - गझल संग्रह ३

शब्द माझे मैफलीसाठी हा माझा तिसरा ऑनलाईन गझल संगह! या संग्रहामधे 2005-06 मधे लिहिलेल्या आणि प्रामुख्याने मनोगत.कॉम वर प्रकाशित झालेल्या गझला आहेत.

अखंड मैफल - कविता संग्रह १

माझ्या मुक्तछंद आणि छंदबद्ध कवितांचा संग्रह. ह्या संग्रहातल्या बहुसंख्य कविता १९९९ ते २००५ ह्या कालावधीमध्ये लिहिलेल्या आहेत. काही कविता मायबोली, मनोगत इत्यादी संकेतस्थळांवर प्रकाशित झालेल्या आहेत.

बायको जेंव्हा बोलत असते - हास्यकविता संग्रह १

माझ्या हास्य कविता, विनोदी कविता, हजला आणि हलक्या फुलक्या कवितांचा संग्रह. बहुसंख्य हास्यकविता २००२ ते २००६ ह्या कालावधीमध्ये लिहिलेल्या आहेत. काही कविता मायबोली, मनोगत इत्यादी संकेतस्थळांवर प्रकाशित झालेल्या आहेत आणि "आनंदाचं गांव" कार्यक्रमात सादर करत आलो आहे.

नाच रे चोरा - विडंबन संग्रह १

नाच रे चोरा हा माझा ऑनलाईन विडंबन संग्रह. या संग्रहामधे काही प्रस्थापित लोकप्रिय गाण्यांची मी केलेली विडंबनं संग्रहित केली आहेत. यातील बहुतांशी विडंबनं ही 2002 ते 2004 या दरम्यान लिहिलेली आणि मायबोली.कॉम वर प्रकाशित झालेली आहेत. शिवय यातली काही विडंबनं ही लोकांनी कॉपी-पेस्ट करून ईमेलद्वारे मुक्‍तपणे वाटलेलीही आहेत.

फेसबुकवरच्या कविता!

या संग्रहात २०१३ मध्ये प्रामुख्याने फेसबुकवर स्टेटस अपडेट करताना जे काही कवितांसारखं भासणारं लिहिलं त्यांचा समावेश आहे!