आग हृदयी, वादळे डोळ्यांत का?
माणसे या गावची गुंत्यात का?
पाहिले माझ्यात ऐसे काय हे?
आरसा पाहुन मज प्रश्नात का?
काळजाने पाहिजे स्पंदायला
पत्थरांसम माणसे जगतात का?
सोबतीला हाय, एकाकीपणा
वाळवंटे भोवती उरतात का?
मूळ गझलकार: शहरयार, गायक: सुरेश वाडकर, चित्रपट: गमन
मूळ गझल:
सीने मे जलन, आंख मे तूफानसा क्यूं है
इस शहर मे हर शक्स परेशानसा क्यूं है
क्या कोई नयी बात नजर आती है हममे
आईना हमे देखके हैरानसा क्यूं है
दिल है तो धडकने का बहाना कोई ढुंढे
पत्थरकी तर्हा बेहिस-ओ-बेजानसा क्यूं है
तनहाई की ये कौनसी मंझिल है रफ़ीकों
ताहद्द-ए-नजर एक बयाबान सा क्यूं है
(स्रोत: गीतमंजुषा.कॉम)
बेहिस - संवेदनाहीन
बयाबान - वाळवंट
(आवडत्या गझलेचा मराठी मधे भावानुवाद करण्याचा माझा हा पहिलाच प्रयत्न आहे. )