स्पर्शसुख!

तुम्हाला कडकडून भूक लागलेली असते. समोरच्या ताटात वाफाळता भात अन त्यावर गरमागरम वरण येतं. बाजूला एक लिंबाची फोड आणि आंब्याचं लोणचं असतं. भातावर ते लिंबू पिळतानाचा त्याच्या सालीचा जाड-आंबट स्पर्श… भात कालवताना बोटांना बसलेले चटके… एका बोटानं लोणच्याचा खार भाताला लावताना बोटाला लोणच्याचा झालेला तिखट स्पर्श… मग तो घास घेताना ओठांना, दातांना, जिभेला झालेला गरमा गमर तिखट खारट गोडचट सुखद स्पर्श…. बोटांपासून ओठांपर्यंत… ओठांपासून जीभ घसा आणि अन्ननलिकेपर्यंत जाणवत झिरपत जाणारा हे अन्नाचे स्पर्श…. अनुभवले आहेत कधी हे स्पर्श… हे असे पूर्णपणे…?
Average: 8 (1 vote)