चाल: उष:काल होता होता काळरात्र झाली
चला आता झोपू आपण फार रात्र झाली
आहे उद्या कामावरती वाह्यची हमाली
उघडतोच आहे आता घड्या पांघस्र्णांच्या
घाईनेच शिरतो आहे कुशित अंथस्र्णांच्या
घेतल्याच हाती आता उशा आणि शाली
आहे उद्या कामावरती वाह्यची हमाली
पिदडलो आहे मी इतका दुखे अंग सारे
येत आहे खोली मध्ये जरा गार वारे
आहे अता डोळ्यावरती खूप झोप आली
आहे उद्या कामावरती वाह्यची हमाली
जागवू नका मज आता आहे झोपलो मी
स्वप्नमयी दुनियेमध्ये आहे गुंगलो मी
स्वर्गसुख मिळते जेंव्हा झोप पुरी झाली
आहे उद्या कामावरती वाह्यची हमाली