सुखांचे सॅशे!

आपण किराणामालाच्या दुकानात उभे असतो, मुलानी कुठलीशी दुधात घालायची पावडर आणि बायकोनी कुठलासा लै भारीवाला शांपू आणायला सांगितलेला असतो. या दोन्हीच्या रेग्युलर पॅक्सवरच्या किंमती बघून आपले डोळे पांढरे व्हायची वेळ आलेली असते. आपण ते घ्यावेत का नाही या द्विधा मनःस्थितीत असताना दुकानदार हळूच सांगतो, ‘दोन्हीचे सॅचे आहेत साहेब, try करून बघा ’ मग आपण ते ‘सॅचे’ किंवा सॅशे बघतो… अगदीच पाच-दहा रुपयांना असतात. खुष होऊन आपण दोन्हीचे दोन-चार सॅशे घेऊन टाकतो आणि ताठ मानेनं घरी परत जातो!!
Average: 10 (1 vote)