नाच रे चोरा

प्रसाद शिरगांवकर

चाल: नाच रे मोरा अंब्याच्या वनात

नाच रे चोरा
नाच रे चोरा तांब्यांच्या घरात
नाच रे चोरा नाच!

कुलुपाला किल्ली जुळली रे
आता तुझी कळी खुलली रे
आता तुझी पाळी उचकट ती जाळी
घरात घुसून तू नाच

तांब्यांच्या घरात तू शिरलास का
शिस्र्न तू घरभर फिरलास का
फिस्र्न तु दमलास, दमुन तु झोपलास
उठून आता तू नाच

नाच रे चोरा तांब्यांच्या घरात
नाच रे चोरा नाच!

Average: 7.9 (56 votes)