साड्यांचे रंग!

संग तसा नेहमीचा, बायकोसोबत साडी खरेदीला गेल्याचा! "ही लिंबू-पारवा कॉम्बिनेशनची साडी कशी वाटतिये?" बायकोनी विचारलं... "लिंबू... आणि पारवा...? हे रंग आहेत...?" माझा प्रश्न... "बरं, ही जाऊ दे... ती श्रीखंडी कशी आहे?"... बायकोचा प्रतिप्रश्न... "श्रीखंडी?... नको... चिकट असेल..." मी उगाच विनोद मारायचा प्रयत्न केला... पण त्यावर बायको आणि तिला उत्साहानं साड्या दाखवणारा सेल्समन दोघांच्या चेहऱ्यावरची सुरकुतीही हालली नाही... "बरं, ते ही जाऊ दे.... चिंतामणी किंवा गुलबक्षी रंगात काही बघू का यंदा" बायकोनी विचारलं... आता मला माझ्या अज्ञानाची प्रकर्षानं जाणीव व्हायला लागली...!
Average: 10 (1 vote)