प्याला

प्रसाद शिरगांवकर

हाती दिलास माझ्या हा मंतस्र्न प्याला
केला रिता तरीही जातो भस्र्न प्याला!

साकी तुझ्या सुरेची आहे अशीच जादू
जातो तहानल्याला प्यासा कस्र्न प्याला

याहून वेगळा रे माझा वसंत नाही
येतो पुढ्यात जेंव्हा हा मोहस्र्न प्याला

श्वासांत आज आली ती पौर्णिमा सुखाची
मी चांदणीस माझ्या घेतो स्मस्र्न प्याला

जातो जिथे कुठे मी येतो समोर माझ्या
जावे कुठे कळेना मी ठोकस्र्न प्याला

त्यांना कशी कळावी ही सोयरीक माझी
ज्यांच्या हातात जातो हा बावस्र्न प्याला

आहेत आजही या सुरईत थेंब थोडे
ठेवू कशास माझा मी आवस्र्न प्याला

Average: 8.5 (8 votes)