लहानपणीची दिवाळी

प्रसाद शिरगांवकर

मातीच्या सिंहासनावर बसलेले
केवळ दाढी-मिशा-जिरेटोपामुळे ओळखू येणारे
मातीचेच शिवाजी महाराज
नाकांवर, मुंडशांवर टवके उडाले असूनही
जागोजाग पहारा देणारे मावळे
मोहरी-जवस पेरून उगवलेल्या ‘जंगलातली’
नारळाच्या करवंटीची विहीर
आणि त्यावर पाणी प्यायला आलेला
अोबडधोबड वाघ
एकमेकांत मिसळून गेलेले मल्ल
त्यांच्या शेजारी मिलिटरीतला सैनिक
आणि त्याच्या समोर मातीचा अफजलखान!

आणि आठ दहा दिवस प्रचंड मेहनत घेऊन
उभी केलेली ही मायावी सृष्टी
भाऊबिजेला रात्री
गुहेत ‘अॅटमबॉंब’ लावून उडवून टाकणं

काय सॉलीड दिवाळी असायची लहानपणी!!

Average: 7 (5 votes)