मी नेहमीच्या दुकानात जातो, नेहमीचं वाणसामान घेतो
मी, 'किती झाले?' दुकानदार, '४७०'
मी ५०० ची नोट देतो। तो उरलेले पैसे परत देतो
मी न बघताच खिशात टाकतो
बाहेर येऊन गाडीत बसायच्या आधी सहज बघतो,
तर त्यानं दोन्ही नोटा वीस च्या दिलेल्या असतात
चक्क दहा रुपये जास्त!
काय करावं? परत जावं? का राहू द्यावं?
'एवढं मार्जिन तर सहज काढलं असेल त्यानी
राहु दे आपल्याकडेच', एक मन म्हणतं
'कशाला त्या बिचाऱ्याचे दहा रुपये मारायचे?', दुसरं मन म्हणतं
मी गाडीत न बसता दुकानात परत जातो
मी, 'दस रुपया जादा दिया आपने'
तो हसून पैसे परत घेतो, थॅंक्य़ू म्हणतो
मी घरी जातो,
आणि त्या रात्रीही शांतपणे झोपू शकतो!
दुसऱ्याचे दहा रुपयेही आपल्याकडे आले
तरी शांतपणे न झोपू शकणारे आपण
तुमचे आमचे
शे दोनशे पासून, शे दोनशे कोटींपर्यंत
रुपयेे लुबाडणारे
गल्लीतले पोलीस, दिल्लीतले मंत्री
कोण खरे सुखी?
कोण खरे श्रीमंत?
आणि हे 'त्यांना' कसं समजवायचं!