प्रसाद शिरगांवकर

पौर्णिमेचे चांदणे नेसून ये
आज तू कोजागिरी होउन ये

काल जे शिंपून गेलो अंगणी
चांदणे ते आज तू वेचून ये

हे पहाटेच्या दवाचे थेंबही
आपल्या केसांत तू माळून ये

ठेवले आहेत मी रोझे अता
झिंगणारी ईद तू होउन ये

या उधाणाच्या अशा लाटांवरी
नाव जीवाची तुझ्या सोडून ये

Average: 8.4 (21 votes)