प्रेमाची जोड

प्रसाद शिरगांवकर

लग्न व्हायच्या आधी
जोडीदाराबद्दल वाटणारं प्रेम
हे निव्वळ आकर्षण असतं
पण लग्न झाल्यावरही
आपल्या जोडीदाराचं आकर्षण वाटणं
हे निव्वळ प्रेम असतं!

त्याचं असं आहे की,
दूरच्या जिवांना एकत्र आणायला
आकर्षणाची ओढ लागते
पण बांधलेल्या जिवांना एकत्र ठेवायला
निव्वळ प्रेमाची जोड लागते!!

Average: 8.7 (9 votes)