आठवणींचा पाऊस

प्रसाद शिरगांवकर

मी नसताना जेव्हा माझ्या गावी तू गेला असशील
बेभान होऊन दुपारभर माझ्या अंगणात कोसळला असशील.

सांग मला, मी नव्हतो म्हणून थोडं जास्त दाटलं होतं का?
अंगणामध्ये नेहमीपेक्षा पाणी जास्त साठलं होतं का?

सुटला होता का मृद्गंध, जो नेहमी वेड लावायचा,
वाहिला का गार वारा, जो माझ्या मागे धावायचा

आभाळ भरून दाटला असेल, जांभळ्या मेघांचा पूर
विजांबरोबर नाचण्यामध्ये, तू झालाही असशील चूर

पहीला स्पर्श तुझ्या थेंबांचा, राहून राहून छळतो आहे,
तू नाही आलास तरी तूझ्या आठवणींचा पाऊस कोसळतो आहे

Average: 7.3 (13 votes)