आता कुठे जरासे जगणे वसूल झाले
माझेच दुख माझ्या ह्रुदयी कबूल झाले
तुमच्या रणांगणावर निशस्त्र थांबलो मी
तुमचेच शब्द माझ्या हुदयात शूल झाले
तुमच्या वृथा प्रथांची का कौतुके करावी?
तुमच्या अशा प्रथांनी हसणे मलूल झाले
रे पावसा जरा तू सांभाळ या सरींना
नाठाळ पत्थरांवर पडणे फिजूल झाले
जादू तुझी कशी ही कळलीच नाही जेंव्हा
माझ्याच आसवांचे आनंदफूल झाले