असाही एक काळ असतो
जेंव्हा वाटतात एकमेकांचे स्पर्श
मुलायम, रेशमी वगैरे
कालांतरानं लग्न होतं!
मग होतात स्पर्श
अधिक गडद, गहिरे
रेशमाची होते लोकर
लोकरीची शाल वगैरे
कालांतरानं एकमेकांसाठी
त्या शालीचेही होतात
फक्त शालजोडीतले!
रेशमी स्पर्शांपासून
शालजोडीतल्या शब्दांपर्यंतचा
प्रवास पचवू शकतं
त्यालाच ‘प्रेम’ म्हणत असावेत
खरंखुरं!!