प्रसाद शिरगांवकर

तुझ्याविना सखे इथे उशी विराण आजही
तुझीच वाट पाहुनी उदास प्राण आजही

विराट सागरावरी तुझाच चांद येतसे
तुझीच लाट अंतरी, तुझे उधाण आजही

नकोस आज वापरू, तुझे धनुष्य तू सखे
अहेत अंतरी इथे जुनेच बाण आजही

नव्या युगास पाहिजे नवीन राम जानकी
कशास वाचतेस तू जुने पुराण आजही

जपून टाक तू तुझी सात पाउले सखे
तुझ्या मनातल्या नव्या दिशा अजाण आजही

Average: 8 (23 votes)