Drupal

माझी द्रुपलगिरी - १०

आक्विया जॉईन करताना जेकबनी विचारलं, ‘आम्हाला ड्रुपलचा सर्टिफिकेशन प्रोग्रॅम तयार करायचा आहे. तुला त्यात काम करायला आवडेल का?’ मी लगेच ‘हो’ म्हणून टाकलं!

Average: 9.5 (4 votes)

माझी द्रुपलगिरी - ९

स्वतःची द्रुपलची कंपनी चालवत असताना एक दिवस माझा शाळेतला मित्र दीपक पुरंदरेचा फोन आला. “अरे तू द्रुपलमध्ये काम करतोस ना? माझ्या एका क्लायंटच्या टिमला द्रुपल शिकायचं आहे. कोणी ट्रेनर माहित आहे का?” असं विचारलं. दीपक तेंव्हा सीड इन्फोटेकच्या कॉर्पोरेट ट्रेनिंग डिपार्टमेंटला काम करायचा. त्यांच्या क्लायंट्ससाठी द्रुपलचं ट्रेनिंग देणारं कोणीच त्याला सापडत नव्हतं. मलाही असं कोणी माहित नव्हतं.

मग त्यानी विचारलं, “तू करशील का हे ट्रेनिंग?” ट्रेनिंग गोव्यामध्ये असणार होतं. यायचा, जायचा, रहायचा खर्च आणि वर ट्रेनिंगचं छानसं मानधनही मिळणार होतं! लगेच ‘हो’ म्हणून टाकलं!

Average: 9.3 (3 votes)

माझी द्रुपलगिरी - ८

द्रुपलवर आधारित असा स्वतःचा व्यवसाय सुरु केल्यानंतर पुढच्या दोनचार महिन्यांतच पुण्यात द्रुपल कॅंप होता. द्रुपल कॅंप म्हणजे द्रुपलमध्ये काम करणाऱ्या त्या त्या शहरातल्या लोकांचं एक स्नेहसंमेलन. हा प्रकार तसा नवाच होता मला. आणि तो पुण्यातही नवा होता. पुण्याचा पहिलाच द्रुपल कॅंप होता तो. मी त्यासाठी माझं सेशन प्रपोजल दिलं. (म्हणजे मला इथे बोलायची इच्छा आहे असं सांगितलं) आणि ते स्वीकारलं गेलं.

Average: 9 (2 votes)

माझी द्रुपलगिरी - ७

त्या काळात शुद्ध मराठी वेबसाईट तयार करण्यात फार कोणाला रस नसायचा. "वेबसाईट इंग्रजीतच पाहिजे” असाच बहुसंख्य लोकांचा हट्ट असायचा. मग मी कोणाला कोणाला मराठीतच वेबसाईट करणं गरजेचं असेल यांची यादी केली. सुरुवात मराठी दिवाळी अंक आणि प्रकाशकांपासून केली. त्यांच्यासाठी काही पॅकेजेस तयार केली. पत्रं पाठवली. ओळखी काढून भेटलो. पण त्यात फार काही यश मिळालं नाही. जी काही थोडीफार कामं मिळाली ती अगदीच तुटपुंज्या मोबदल्याची किंवा थॅंक्यू बेसिसची मिळाली!

Average: 9 (2 votes)

माझी द्रुपलगिरी - ६

मराठी वेबसाईट्स डॉट कॉमच्या बॅनरखाली आम्ही बऱ्यापैकी काम करू शकलो. ‘आम्ही’ अशासाठी की आता मी एकटा नव्हतो, टीम होती. आणि जे काम केलं, हातून घडलं ते मी एकट्यानी केलं नाही तर संपूर्ण टीमनं केलं. तीन-चार वर्षांच्या काळात आम्ही पन्नास-साठ मराठी वेबसाईट्स केल्या. वधुवर सूचक मंडळांपासून ते प्रकाशकांपर्यंत, साहित्य संस्थांपासून ते लेखकांच्या व्यक्तिगत साईट्स पर्यंत. सेवाभावी संस्था, वाचनालयं, मासिकं. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मराठी वेबसाईट्स तयार केल्या आम्ही.

Average: 9 (2 votes)

माझी द्रुपलगिरी - ५

मराठीमध्ये उत्तमोत्तम, दर्जेदार आणि अत्याधुनिक वेबसाईट्स तयार व्हायला पाहिजेत हे स्वप्न उराशी बाळगून अन त्या दुसरं कोणी करत नसेल तर आपणच केल्या पाहिजेत हे ध्येय मानून मी स्वतःच्या व्यवसायात उडी मारली. परदेशी कंपनीतला उबदार पगार आणि आरामदायी लाईफस्टाईल सोडून ही अशी उडी मारणं जरा रिस्कीच होतं. पण तरी मी केलं. स्वतःवर आणि द्रुपलवर विश्वास होता आणि बायकोची साथ.

Average: 9 (2 votes)

माझी द्रुपलगिरी - ४

युनी-सरस्वती हा मी लिहिलेला फक्त एक Javascript चा code होता. जेमतेम एक पानी code. माझ्या द्रुपलच्या साईटवर मी काहीतरी जुगाड करून जोडला होता (द्रुपलमध्ये development कशी करायची हे शिकलो नव्हतो तेंव्हा). तो प्रकाशित केल्यावर काही दिवसांनी माझा मायबोली / मनोगत वरचा एक कवी आणि तंत्रज्ञ मित्र @tushar joshi ची एक मेल आली. तो म्हणाला, तुझ्या code वर आधारित एक द्रुपलचं मोड्युल मी develop केलंय आणि ते द्रुपलला contribute ही केलंय. बघ कसं झालंय ते. मी बघितलं. अफलातून काम केलं होतं तुषारनी.

Average: 9 (2 votes)

माझी द्रुपलगिरी - ३

तर माझी पहिली मराठी वेबसाईट साधं-सोपं डॉट कॉम मी द्रुपलमध्ये तयार करून लॉंच केली. एकाच लेखक / कवीचं सर्व साहित्य एकाच ठिकाणी प्रकाशित असलेली ती मराठीतली कदाचित पहिली वेबसाईट.

साधं सोपं डॉट कॉमवरच्या कविता / लेखांवर वाचकांना कमेंट्स करायची सोय दिली होती. ती ही त्यांना इंग्रजी कीबोर्ड वापरून उच्चारानुसार मराठीत टाइप करता यावं अशी. या सोयीसाठी तेंव्हाच्या एका प्रसिद्ध मराठी वेबसाईटवरचा मराठी टायपिंग करताचा JavaScript चा code मी घेतला होता. त्या code साठी त्या साईटचे जाहीर आभारही मानले होते.

Average: 9 (2 votes)

माझी द्रुपलगिरी - २

मी कॉमर्स साईडचा माणूस. तंत्रज्ञान, इंजिनियरिंग, प्रोग्रॅमिंगचा माझ्या शिक्षणाशी दूर दूरचाही संबंध नाही! कॉलेज संपताना B. Com आणि ICWA एकाच वेळी पूर्ण केलं आणि एका मोठ्या फार्मा कंपनीच्या कॉस्टिंग डिपार्टमेंटमध्ये खर्डेघाशी करायची नोकरी धरली. ती खर्डेघाशी करताना कॉम्प्युटर माझ्या आयुष्यात आला. कंपनीतल्या जुन्या धेंडांना कॉम्पयुटर आवडायचे नाहीत, त्यावरचं काही काम जमायचंही नाही. मी वीस वर्षांचा उमेदीचा वगैरे तरुण होतो, आपलं आपण नवीन काम शिकून घ्यायचो. त्यामुळे कॉम्प्युटरसंबंधी सगळी कामं माझ्यावर पडायची. मीही challenge म्हणून घ्यायचो आणि उत्साहानी करायचो. त्यावेळी Excel नवं नवं आलं होतं.

Average: 8 (1 vote)

माझी ड्रुपलगिरी

तर त्याचं असं झालं की, आपलं सगळं बहुमोल वगैरे लिखाण एक सॉफ्टवेअर करून आर्काइव करून ठेवलं पाहिजे असं मला वाटलं. आपलं लिखाण आपल्याला हवं तेंव्हा हवं ते शोधता आलं पाहिजे आणि शोधून वाचता आलं पाहिजे अशी काहीतरी सोय करुया असं वाटलं.
Average: 9.5 (4 votes)