तिनं विचारलं, ‘हे जीवन काय आहे रे?
आणि जगणं म्हणजे काय?
फार पाल्हाळ लावू नकोस,
एका शब्दात सांग!’
मी म्हणालो, ‘मूर्खपणा!’
‘ह्या, काहितरीच काय, काहीतरी असेलच ना अर्थ’
असं ती म्हणल्यावर
मी म्हणालो, ‘बरं, ठीके, मग शोधून बघ तू!’
ती शांत झाली, निघून गेली
शोधलं काहीसं तिने
मग परत आली अन म्हणाली
‘तू म्हणालास ते एेकलं, मूर्खच आहे मी…
आणि काहीतरीच मला सांगितलंस
महामूर्ख आहेस तू’
मी म्हणालो, ‘Exactly! हेच मी म्हणत होतो'