दहिहंडी तूफान रंगली, गोविंदा बेभान नाचले

प्रसाद शिरगांवकर

दहिहंडी तूफान रंगली, गोविंदा बेभान नाचले
'होटोंको सीनेसे फेविकॉलसे चिपकाके' नाचले
चिकन्या चमेलीच्या आठवणीत, पाैवा चढाके नाचले
रिक्षावल्यासोबत, उशिर झालेलीची वाट बघत नाचले
'कोंबडी' वर नाचले, 'कबुतर'वर नाचले, 'तोतामैनावर' नाचले
मतांच्या भिकेसाठी खैरात झालेल्या
लाखो करोडोंच्या चुराड्यावर नाचले

दहिहंडी तूफान रंगली, गोविंदा बेभान नाचले….

Average: 7 (1 vote)