प्रसाद शिरगांवकर

जीवनामध्ये कितीही टाळली स्पर्धा...
हाय, माझ्या पाचवीला पूजली स्पर्धा

गात होतो मी सुखाने माझियासाठी
सूर मग आले दुज्यांचे, लागली स्पर्धा

आवडे कोणी उगा, ना आवडे कोणी
वाटते आता मलाही चावली स्पर्धा

प्रषितांनी तीच ती सांगीतली सत्ये
संप्रदायांची तरीही चालली स्पर्धा!

एकएकाच्या उरी आपापली वीणा
जाणता हे सत्य आम्ही, लोपली स्पर्धा!

Average: 5 (3 votes)