पाकळ्यांची जात

प्रसाद शिरगांवकर

ना रिता झाला कधी त्या लाजर्‍या मेघात मी
आजही थांबून आहे पापणीच्या आत मी

ज्या ठिकाणी श्वास माझा कोंडला होता कधी
त्या हरामी मैफ़लीचे गीत नाही गात मी

सोसले या जीवनाचे त्रास मी कित्येकदा
पाहिले मागे पुढे ना टाकताना कात मी

आजही फुसकाच आहे हा फटाका का तुझा
या फटाक्याची तुझ्या रे खोललेली वात मी

जात आणि धर्म माझा आगळा आहे सखे
मी फुलांचा धर्म आणि पाकळ्यांची जात मी

Average: 7.5 (2 votes)