निवडणुक लढवायची तर...

प्रसाद शिरगांवकर

देशासाठी चांगलं काही करायचं, तर सत्तेत आलं पाहिजे
सत्तेत यायचं तर, निवडणुक जिंकायला पाहिजे
निवडणुक लढवायची, तर खूप पैसा पाहिजे
खूप पैसा असेल, तर तो काळा असायला पाहिजे
काळा पैसा हवा, तर काहितरी वाईट काम केलं पाहिजे

थोडक्यात.... देशासाठी चांगलं काही करायचंच असेल
तर मुळात खूप सारं वाईट काम केलं पाहिजे....

हे चित्र बदलायचं असेल, तर भक्कम कायदा केला पाहिजे
कायदा करायचा, तर सत्तेत आलं पाहिजे
सत्तेत यायचं तर, निवडणुक लढवली पाहिजे...
निवडणुक लढवायची तर……..

Average: 7.3 (12 votes)