एक साधी दिवाळी

प्रसाद शिरगांवकर

एक साधी दिवाळी
तिच्या आभाळभरून आठवणी!

लहानपणची फटाके-किल्ल्याची दिवाळी
तरुणपणीची मित्रांच्या कल्ल्याची दिवाळी

प्रेमात पडल्यानंतरची आतूर दिवाळी
प्रेमभंग झाल्यानंतरची निष्ठूर दिवाळी

लग्न ठरल्यानंतरची 'बेडा पार' दिवाळी
लग्न झाल्यानंतरची जबाबदार दिवाळी

अनोळखी, नव्या देशातली 'तडजोड' दिवाळी
स्वतःच्या नव्या घरातली गोडचगोड दिवाळी

खिशात पैसे असतानाची, अमीर दिवाळी
खिशात पैसे नसतानाची, फकीर दिवाळी

एक साधी दिवाळी
तिच्या आभाळभरून आठवणी!

तरीही प्रत्येक दिवाळी
नवीच प्रत्येक क्षणी

तरीही प्रत्येक दिवाळी
हवीच प्रत्येक क्षणी!!

No votes yet