एक हजार पुरुष बालकांमागे, आठशेच स्त्री बालकं

प्रसाद शिरगांवकर

एक हजार पुरुष बालकांमागे
आठशेच स्त्री बालकं जगू देणारा आपला समाज,
त्यातून तयार होणारे कमीत कमी 200 'वंचित' पुरुष,
त्यांच्या आजुबाजूला
टीव्ही, सिनेमे आणि इंटरनेटद्वारे वाहणारी
सेक्स आणि पॉर्नची मुक्त गंगा,
'शारीरिक सुख हाच सर्वोच्च आनंद' या संदेशाचा
चहुदिशांनी सतत होणारा भडिमार,
या 'आनंदात' रमताना दिसलेले
काही थोर राजकीय, अध्यात्मिक आणि सामाजिक नेते...
आणि आपण काहीही केलं तरी
कायदा आपलं झाट वाकडं करू शकत नाही
ही खात्री...

हे सारं आमच्या समोर स्पष्ट दिसत असतानाही
आम्ही हतबल होऊन विचार करतो

'आज पुन्हा कसा बलात्कार झाला आमच्या शहरात….'

Average: 7 (1 vote)