प्रसाद शिरगांवकर

अक्षरांच्या घोळक्याला चाल का लाभू नये?
हाय माझ्या जीवनाला ताल का लाभू नये?

वार यांचे वार त्यांचे झेलतो छातीवरी
वार रोखायास साधी ढाल का लाभू नये?

आज माझ्या आसवांना सोडले वार्‍यावरी
वाहण्याला आसवांना गाल का लाभू नये?

थांबलो आहे कधीचा घेउनी हाती तळी
येळकोटाला सुखांची पाल का लाभू नये?

का नशीबातील पाटी आजही कोरी अशी
पाचवीला कोरलेले भाल का लाभू नये?

Average: 8.3 (3 votes)