आयुष्यात पुन्हा रंग भरण्यासाठी

प्रसाद शिरगांवकर

आयुष्यात पुन्हा रंग भरण्यासाठी
हे एवढं करून बघा

कधीकाळी ज्या व्यक्तीशी
तासन तास, विनाकारण, विनाविषय
उगाचच गप्पा मारल्या होत्या
आणि दुरावा असह्य होऊन
ज्या व्यक्तीशी लग्न केलं होतं
त्याच व्यक्तीशी आता
तासन तास, विनाकारण, विनाविषय
उगाचच भांडतो का आहोत?
हे इतकंच स्वतःला विचारुन बघा!

आणि मग, काहीही कारण नसताना
कोणताही विषय नसताना
उगाचच त्याला किंवा तिला फोन करून
तासन तास गप्पा मरून बघा….

आयुष्यात पुन्हा रंग भरण्यासाठी
हे एवढं करून बघा

Average: 8 (8 votes)