आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच!

प्रसाद शिरगांवकर

आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच!
पहिले घड्याळवाले आद्य काकासाहेब
दुसरे घड्याळवालेच ज्युनियर दादासाहेब
तिसरे वाघवाले धनुष्यबाणसाहेब
आणि चौथे मराठीवाले रेल्वेइंजिनसाहेब

हे सोडून
हात थरथरणारे पंजासाहेब
आणि
रनआऊट होणारे कमळसाहेब वगैरे आहेत खरे
पण ते त्यांच्या त्यांच्या परमोच्च साहेबांच्या आदेशानुसार चालत असल्यामुळे
ते काही तितकेसे महत्वाचे नाहीत

तर मूळ मुद्दा काय
की आपल्या महाराष्ट्रात साहेब चारच!
दोन घड्याळवाले, एक वाघवाले अन एक मराठीवाले...

यातला कोणतातरी साहेब
कधीतरी खराखुरा वाघ बनेल,
हातात धनुष्यबाण घेईल,
आणि मराठीचं बंद पडलेलं घड्याळ
रेल्वे इंजिनसारखं पळवायला लावेल
अशी वेडी आशा
उगाचच वाटते राव आम्हाला….

Average: 3.5 (4 votes)