प्रसाद शिरगांवकर

मी तुलाच पूजले अपार
दुःख तू मला दिले अपार

एकही न गंध जीवनी
ऐकतो तुझी फुले अपार

स्वर्गलोक गाठण्या तुझा
हाय, हाल सोसले अपार

आज गाल कोरडे जरी
तोय काल वाहिले अपार

जा नको तुझे तसू मला
सागरात शिंपले अपार

Average: 7.8 (11 votes)