प्रेरणादायी

शब्द माझे मैफलीसाठी

ओठ जैसे बासरीसाठी
शब्द माझे मैफलीसाठी

स्पंदनांच्या रोजच्या वार्‍या
ज्ञानियाच्या पालखीसाठी

माझा भारत...

असायचा तेजाचा पर्वत माझा भारत
करायचा तार्‍यांशी शर्यत माझा भारत

कितीक नेते, किती लफंगे, भ्रष्टाचारी
लुटणार्‍यांची बनला दौलत माझा भारत

फुलतो अजून मी

पाहून माणसांना बुजतो अजून मी
गर्दीत एकट्याने जगतो अजून मी

सौद्यात जीवनाच्या हरलो कितीकदा
बाजार मांडताना दिसतो अजून मी

आज ना उद्या...

बीज लावले, रुजेल आज ना उद्या
वृक्ष गोजिरा झुलेल आज ना उद्या

एवढ्यात आवरू नकोस पाकळ्या
गंध अंगणी भरेल आज ना उद्या

वादळाचे गीत आता

वादळाचे गीत आता आणुया ओठांवरी
पावसाचे थेंब थोडे झेलुया अंगावरी

पान नाचे, फूल नाचे, नाचती साऱ्या दिशा
आसमंती मेघ वाजे, वीज नाचे अंबरी

मी असा आभाळवेडा

मी असा आभाळवेडा पंख मी फैलावतो
तोडुनी बेड्या जगाच्या उंच मी झेपावतो

मानली नाही कधीही कोणतीही बंधने
ना कुणाही वादळाने मी कधी थंडावतो

मर्म

ठोकरूया धर्म सारे
या, करूया कर्म सारे

स्वर्ग हा कर्मात आहे
जाणुया हे मर्म सारे

बंधने तोडू...

भूतकाळाची नकोशी बंधने तोडू
वर्तमानाशी नव्याने नाळ या जोडू

कालचे जे भूत होते कालचे होते
`काल' साठी मी सुखांचा `आज' का सोडू

घरकुल

तुझ्या नि माझ्या घर्मकणांनी बनलेले घरकुल
तुझ्या नि माझ्या प्रेमफुलांनी सजलेले घरकुल

चहुदिशांना तांडव भरल्या लाटा असताना
तुझी नि माझी ओढ बघोनी तरलेले घरकुल

एकटा मी चालतो

थांबले केंव्हाच सारे, एकटा मी चालतो
सोबतीला फक्त तारे, एकटा मी चालतो

धाव घेण्यालायकीची एकही नाही दिशा
भोवताली खिन्न वारे, एकटा मी चालतो

पाने

Subscribe to प्रेरणादायी