प्रसाद शिरगांवकर

बेभान नाचणारे बेहोष घुंगरू मी
बेताल पावसाची का आर्जवे करू मी?

आभाळ व्यापण्याची उर्मी उरात माझ्या
का फाटक्या दिशांचे आभाळ पांघरू मी?

माझ्याच बासरीचे रानात सूर सार्‍या
सांगा कुणाकुणाचे वनवास मंतरू मी?

विश्वात राहतो या, मी मालकाप्रमाणे
माझ्याच अंगणी का लाजून वावरू मी?

ओलांडल्या सुखांच्या कित्येक ओहट्या मी
आता उधाण माझे का सांग आवरू मी?

Average: 8.3 (12 votes)