सव्वा अब्ज लोकांचे अडीच अब्ज हात

प्रसाद शिरगांवकर

सव्वा अब्ज लोकांचे
अडीच अब्ज हात
अहोरात्र मेहनत करायला तयार असताना
या देशाचा कायापालट होणं
सहज शक्य आहे राव!

अडचण आहे ती फक्त ५४५ राज्यकर्ते
आणि ते चालवत असलेल्या यंत्रणेतल्या
काही लाख हातांच्या
स्वार्थीपणाची
आणि त्यांच्या चिल्लर वागण्यामुळे होणाऱ्या
आमच्या आणि देशाच्या गोचीची

हे बदलायचं कसं?

जाऊ दे यार,
फेसबुक किंवा व्हॉट्सअॅप वरचा
पुढचा जोक वाचून फॉरवर्ड करुया....

Average: 6 (6 votes)