आजवर जे वाटलं ते लिहिलं
जसं वाटलं तसं लिहिलं
जे लिहिलं ते आॅनलाईनच पोस्ट केलं
कधी फोरम्सवर
कधी स्वतःच्या वेबसाईटवर
कधी फेसबूकवर
कधी विचार नाही केला
लिहिण्याच्या किंवा पोस्ट करण्याच्या
स्ट्रॅटेजी बिटेजीचा
किंवा कोण काय म्हणेल
कोणाला आपल्या बद्दल काय वाटेल याचा
किंवा कोणाला काय रुचेल, काय पटेल याचाही
पण हे सगळं आॅनलाईनच बरं असतं!
खऱ्या आयुष्यात मात्र
मी खूप विचार करतो
बोलावं का बोलू नये
बोललो तर कोणाला काय वाटेल
ह्याला सांभाळू का त्याला सांभाळू
वगैरे याचा….
काय गंमत आहे ना
खऱ्या आयुष्यात मी खोटं वागतो
आणि खोट्या आयुष्यार खरं!!
किंवा असंही असेल कदाचित
खऱ्या आणि खोट्याच्या व्याख्या
बदलल्या जात आहेत…
कायमच्या...