तू तेंव्हा जोशी

प्रसाद शिरगांवकर

चाल: तू तेंव्हा तशी

तू तेंव्हा जोशी
तू आत्ता जोशी
तू खरी आहेस जोशांची

एक चहा साधा
मला नाही दिला
तू पक्की आहेस पुण्याची
तू तेंव्हा जोशी
तू आत्ता जोशी

साडी तुझी जुनी चोळी तुझी जुनी
तुला नाही ओढ नव्याची
तू तेंव्हा जोशी
तू आत्ता जोशी

(माहेरच आणि सासरचही आडनाव जोशी असलेल्या तमाम सुंदर्‍यांना अर्पण!!)

Average: 8 (14 votes)