तू चष्मा सांभाळ

प्रसाद शिरगांवकर

चाल: फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार

गळक्या नाकावरती आहे चष्मा तो नाठाळ
गाढवा तू चष्मा सांभाळ

हाती तुझीया स्र्माल नाही
पदर कुणाचा जवळही नाही
नाक सारखे गळतच राही
घे स्र्माल अन नाक तुझे रे पूस आता तू बाळ
तू चष्मा सांभाळ, गाढवा तू चष्मा सांभाळ

इतकेही का समजत नाही
सांगुनही तू पुसत का नाही
माझे का तू ऐकत नाही
काढीन म्हणतो आता तुझिया कानाखाली जाळ
तू चष्मा सांभाळ, गाढवा तू चष्मा सांभाळ

गळक्या नाकावरती आहे चष्मा तो नाठाळ
गाढवा तू चष्मा सांभाळ

Average: 6.6 (10 votes)