तू खुले आकाश माझे, तू नवा विश्वास माझा (हजल)

प्रसाद शिरगांवकर

तू खुले आकाश माझे, तू नवा विश्वास माझा
मी तुझ्यासाठी बुडवतो गायनाचा क्लास माझा

नेहमीची ही परीक्षा, तीच पुढल्या बेंचवरती
पाठ होते पाठ अन हुकतो सदा फस्क्लास माझा

आठ केळी, अन रताळी अन किलोभर साबुदाणा
फक्त इतके चापले मी, आजतर उपवास माझा

शास्त्र ना कुठलेच कळले, नेहमी चुकली गणीते
वाढतो आहे भुगोल अन गंडला इतिहास माझा

थंड मी वरवर जरीही, आतुनी संतप्त आहे
या मनाच्या आत आहे छानसा थर्मास माझा...

Average: 6 (2 votes)