तुझ्या आजीसाठी

प्रसाद शिरगांवकर

चाल : इंद्रायणी काठी

तुझ्या आजीसाठी, आणली ही काठी
आता तरी मिठी, मार मला

तुझ्या आजोबांचे, ऐकतो सगळे
नाचतो तुझिया, मागे पुढे

बापा तुझ्या वाटे, आहे मी उनाड
नाही त्यांना चाड, काव्याची या

उनाड राहिलो, उजाड होउन
कविता गाउन, तुझिया साठी

Average: 7.4 (11 votes)