पेटवा पेटवा

प्रसाद शिरगांवकर

चाल: केशवा माधवा तुझ्या नावात रे गोडवा

पेटवा पेटवा
ह्याच्या कानाखाली पेटवा

इतका मोठा झाला घोडा
तरी sense या नाही थोडा
गच्च गचांडी पकडुन याच्या
कानफटी वाजवा
पेटवा... पेटवा...
ह्याच्या कानाखाली पेटवा

या अकलेच्या कांद्यासाठी
येवढेच हो आपल्या हाती
दिसेल तेथे बुकलुन काढू
पाडुनी आडवा
पेटवा... पेटवा...
ह्याच्या कानाखाली पेटवा

Average: 7.8 (103 votes)