माधुरीचा राम

प्रसाद शिरगांवकर

चाल: कौसल्येचा राम बाई, कौसल्येचा राम

माधुरीचा राम बाई
माधुरीचा राम
सगळे म्हणती हा नेने
आहे भाग्यवान बाई
आहे भाग्यवान

वेड लावणार्‍या सार्‍या
पाहुनि अदा
कितीतरी होते येथे
हुसेन फिदा
हाय आला राम बाई
हाय आला राम
सगळे म्हणती हा नेने
आहे भाग्यवान बाई
आहे भाग्यवान

किती तुझ्या प्रेमासाठी
जाहले फकीर
घेउनिया तुजला गेला
ABCD वीर
हा नेन्यांचा राम बाई
हा नेन्यांचा राम
सगळे म्हणती हा नेने
आहे भाग्यवान बाई
आहे भाग्यवान

चूर चूर झाली येथे
काळिजे किती
फक्त तुझा फोटो आता
सखा सोबती
दुष्ट तुझा राम बाई
दुष्ट तुझा राम
सगळे म्हणती हा नेने
आहे भाग्यवान बाई
आहे भाग्यवान

Average: 7.1 (31 votes)