दिवस असे की

प्रसाद शिरगांवकर

चाल: दिवस असे की कोणी माझा नाही

दिवस असे की
दात घासले नाही
अन अंघोळ केली नाही

दिवसाही मी निवांत आता निजतो
दिसेल तेथे अंथस्र्ण पसस्र्न देतो
अंथस्र्ण माझे कधीच उचलत नाही
मज आता उठवत नाही!

जिकडे तिकडे सगळे नुसते कपडे
धुतलेले अन न धुतलेले कपडे
त्या कपड्यांना घड्याच घालत होतो
पण अता घालवत नाही

निर-उद्योगी आहे मी वा आळशी
बोलू नकाना कोणीही माझ्याशी
मजला तुम्ही हजार नावे ठेवा
मज काहीच वाटत नाही!

Average: 8.3 (22 votes)