प्रसाद शिरगांवकर

आज हापिसात मी झोपलो म्हणे जरा
काम सर्व टाळुनी लोळलो म्हणे जरा!

आसपास माझिया एकवार पाहिले
पाय ताणले जरा... पेंगलो म्हणे जरा

नीज लागता मला, स्वप्न पाहिले तुझे
हाय, तोल जाउनी, सांडलो म्हणे जरा!

झोप लागली अशी... गाढ गाढ गोड ती
सांगतात लोक की, घोरलो म्हणे जरा

झोप झोप झोपुनी सुस्त जाहलो असा
मी पुरा मढ्यापरी भासलो म्हणे जरा!

Average: 5.8 (15 votes)