झाली बेभान ही तारा

प्रसाद शिरगांवकर

चाल : असा बेभान हा वारा

झाली बेभान ही तारा, कुठे रे धाव मी घेऊ
ताराला राग आलेला, कुठे जाऊ, कुठे जाऊ

तराच्या क्रुर मारांचे, जिव्हारी झेलले मारे
झेलुन मार हा सारा, दुखते अंगही सारे
जरा तू घे उरी आता किती मी मारही खाऊ
ताराला राग आलेला, कुठे जाउ, कुठे जाऊ

जटा ओढून या माझ्या, पाठीत धाप तू देशी
भिडे ती लाथ पाठीला, मला ही भोवळ येई
जीवचे फूल हे माझ्या, तुझ्या पायी कसे देऊ

ताराला राग आलेला, कुठे जाउ, कुठे जाऊ

हाताची, पायाचीही तू क्षणी, का मोडली हाडे
पाहुनी मार तो माझा, पळाले दोस्तही सारे
तुटके अंग घेउनी, घरी माझ्या कसा जाऊ

ताराला राग आलेला, कुठे जाउ, कुठे जाऊ
झाली बेभान ही तारा, कुठे रे धाव मी घेऊ

Average: 5.9 (20 votes)