जेवणात ही कढी अशीच राहुदे

प्रसाद शिरगांवकर

चाल : जीवनात ही घडी अशीच राहुदे

जेवणात ही कढी अशीच राहूदे
भाजीच्या वाटीतही कढीच वाढू दे

कालवला पानात भात मोकळा
आठवला माझा कढीभात सोहळा
पानातुन आठवणी अशाच येउ दे
जेवणात ही कढी अशीच राहूदे

कढीच पीत बसण्याची ओढ लागली
पिवुन तीच सगळी मम भूक भागली
सगळ्यातून कढीचाच गंध येउदे
जेवणात ही कढी अशीच राहूदे

Average: 8.6 (30 votes)