प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटले
प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटलेले
प्रत्येक माणसाच्या हृदयात वादळाचे थैमान माजलेले
बाहेरच्या जगाचे पचवून वीष सारे अंतर्मनात जावे
प्रत्येक सागराच्या गर्भास अमृताचे वरदान लाभलेले
प्रत्येक पापणीच्या पडद्यात वेदनांचे आभाळ दाटलेले
प्रत्येक माणसाच्या हृदयात वादळाचे थैमान माजलेले
बाहेरच्या जगाचे पचवून वीष सारे अंतर्मनात जावे
प्रत्येक सागराच्या गर्भास अमृताचे वरदान लाभलेले
वेळ रात्रीची... एकांताची
पाऊस जोराचा... आकांताचा...
खिडकीच्या काचेवर त्वेषानं आपटणारे थेंब
घरात जरी येत नसले
तरी हृदयात खोलवर शिरत रहातात
आणि
घराबाहेरचे वादळवारे आता
मनातही वेगानं फिरत रहातात
भांडण तंटे हे तर तरंग होते
तिचे नि माझे नाते अभंग होते!
एक दुज्यांची काटछाट करताना
शब्दशाप हे हळवे पतंग होते
कुणीतरी आठवण काढतंय या कार्यक्रमामधील एक कविता...
येथे व्हिडियो दिसण्यात काही समस्या येत असल्यास आपण तो येथे पाहू शकाल
'कुणीतरी आठवण काढतंय' या कार्यक्रमाची माहिती आपल्याला येथे मिळू शकेल
ऋतू येत होते, ऋतू जात होते
कधी खिन्न होते, कधी गात होते!
किनारे सुखाचे कुणाला मिळाले?
कितीसे खलाशी समुद्रात होते...
भास आहे सर्वकाही...
जीवनाला अर्थ नाही
तो म्हणे सर्वत्र आहे
(भेट नाही एकदाही...)
तुला सांगतो भगवंता हे असे वागणे असू नये
तुला चेहरा माझा दिसतो, मला तुझा का दिसू नये!
वस्त्र नागडे तेजाचे घे, वा दुलई अंधाराची
तेज-तमाच्या सीमेवरती जिवास उसवत बसू नये!
आपल्या दोघांमधे ही गॅप का?
ऐकतो मी लावण्या, तू रॅप का?
राहतो राणी तुझ्या हृदयात मी
शोधते आहेस गूगल-मॅप का!
भासतो त्यांना सुखाचा दास मी
वेदनांची मांडतो आरास मी!
पाहतो ते ते खरे मी मानतो
केवढे जपतो उराशी भास मी...
काय वाटते मला कशास कोण ऐकतो?
आजकाल मी मनातल्या मनात बोलतो!
रंग वेदनांस देत राहतो नवे नवे
शेवटी मनात मी सुखेच सर्व रेखतो
©2000-2018 Prasad Shirgaonkar, All rights reserved.