वरण इतके गार असुनी

प्रसाद शिरगांवकर

चाल: तरुण आहे रात्र अजुनी

वरण इतके गार असुनी
भात तू खाल्लास का रे?
ओरपूनी भात सगळा
हात तू धुतलास का रे?
भात तू खाल्लास का रे?

बघ तुला वाढतेच आहे,
गरम आणि छान पोळ्या
सोडुनी पण पान अर्धे
हाय तू उठलास का रे?
भात तू खाल्लास का रे?

सांग या भाजी पुरीच्या
जेवणाला काय सांगू
वाढते मी ताट अजुनी
उठुन तू गेलास का रे?
भात तू खाल्लास का रे?

वरण इतके गार असुनी
भात तू खाल्लास का रे?

Average: 8.1 (15 votes)