शतदा प्रेम करावे

प्रसाद शिरगांवकर

चाल: या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

या चिवड्यावर, या भेळीवर
शतदा प्रेम करावे

रगडा पुरी, पाणी पुरी
इच्छा झाली पूरी
दाबेलीच्या पावामधुनी
फिरते माझी सुरी
पुरी टम्मशी बघुन कुणाचे
फुगरे गाल स्मरावे

असती असेही लोकही काही
खाती जगण्यासाठी
आम्ही परंतु आहो ऐसे
जगतो खाण्यासाठी
भेळ्पुरीच्या गाडी वरती
अवघे पोट भरावे

या चिवड्यावर, या भेळीवर
शतदा प्रेम कराव

Average: 8.4 (42 votes)