प्रसाद शिरगांवकर

आले किती खलाशी, गेले किती खलाशी
वाहून सागराने नेले किती खलाशी

आपापला किनारा ज्याचा तयास प्यारा
कोणास खंत नाही मेले किती खलाशी

थोडेच लोक ऐसे जे पाहतात तारे
होतात काजव्यांचे चेले किती खलाशी!

साध्याच वादळाने हे सांडतात सारे
सांभाळतात हाती पेले किती खलाशी?

येता नवा किनारा सोडून नाव देती
रचतात आठवांचे झेले किती खलाशी?

सार्‍या जुन्या स्मृतींचा बाजार मांडलाहे
धुंडाळती सुखांचे ठेले किती खलाशी!

Average: 6.7 (14 votes)