प्रसाद शिरगांवकर

कार्ड यात टाकताच यंत्र हे खुलेल
का उगा उदास तू, 'असेल तर मिळेल'!

सोंग घेतलेस तू हवे तसे तरी
नेहमी खरेच चित्र यंत्र दाखवेल
<--break-->

चित्रगुप्त हे तुझे, कुबेर हे तुझे
स्वर्ग दाखवेल हेच नर्क दाखवेल

धावते तुला बघून ही तुझ्याकडे
तू खिशात टाकताच नोट मोहरेल

बंद पाकिटात ठेव नोट, कार्डही
हासुनी हळूच यंत्र 'बाय'ही करेल

Average: 4.9 (63 votes)